वंदना बर्वे
आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील खासदार राघव चढ्ढा यांच्यावर शनीची वक्रदृष्टी पडली आहे. यामुळे येत्या काळात त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, भारतीय जनता पक्षाचे खासदार सुधांशु त्रिवेदी यांच्यासह पाच खासदारांनी राज्यसभेच्या सभापतींकडे आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दिल्ली सेवा विधेयकासाठी प्रस्तावित निवड समितीमध्ये आपली पूर्व परवानगी न घेता राघव चढ्ढा यांनी त्यांची नावे सुचविली होती. हा भयंकर गंभीर प्रकार असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पाच खासदारांनी केली आहे.
या भाजपचे केएस फांगनॉन कोन्याक, नरहरी अमीन आणि सुधांशू त्रिवेदी, एआयएडीएमकेचे एम. थंबीदुराई आणि बीजेडीचे सस्मित पात्रा यांनी राघव चढ्ढा यांच्याविरोधात विशेषाधिकार प्रस्तावाची मागणी केली आहे. थंबीदुराई यांनी यासाठी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांना पत्र दिले आहे. राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावर चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला होता.
(हेही वाचा – Hardik Pandya : टी-२० सामना गमावला. पण, हार्दिकने जसप्रीत बुमरा आणि अश्विनला टाकलं मागे)
दरम्यान, विशेषाधिकार समितीकडून नोटीस मिळाल्यानंतर आपण उत्तर देऊ, अशी भूमिका चढ्ढा यांनी घेतली आहे. दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठविण्यात यावे आणि त्यात काही नावांचा समावेश करावा, अशी मागणी चड्ढा यांनी केली होती. मात्र, चढ्ढा यांचा हा प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला.
जेव्हा उपसभापतींनी निवड समितीच्या सदस्यांची नावे वाचली तेव्हा गृहमंत्री अमित शाह म्हणाले की पाच सदस्यांनी तक्रार केली आहे की आपचे नेते चढ्ढा यांनी त्यांच्या संमतीशिवाय मांडलेल्या ठरावात नावे समाविष्ट केली आहेत. हा सभागृहाच्या विशेषाधिकाराचा भंग असल्याचे सांगत गृहमंत्र्यांनी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवावे. या पाच खासदारांच्या जागी त्यांच्या वतीने कोणी स्वाक्षरी केली हा तपासाचा विषय आहे, असे शहा म्हणाले. तक्रारदार सदस्यांचे जबाब नोंदवण्याची विनंती केली. शहा यांनी ‘आप’वर संसदीय कामकाजात फसवणूक केल्याचा आरोप केला.
त्यानंतर बीजेडीचे सस्मित पात्रा, एआयएडीएमकेचे केएम थंबीदुराई आणि भाजपचे एस. त्यांचे नाव प्रस्तावित समितीमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांची संमती घेण्यात आली नसल्याचे फांगनॉन कोन्याक यांनी सांगितले. सदस्यांच्या तक्रारींची चौकशी केली जाईल, असे उपसभापतींनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community