विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात Aam Aadmi Party ची माघार ; ‘या’ पक्षाला देणार साथ

159
विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात Aam Aadmi Party ची माघार ; ‘या’ पक्षाला देणार साथ
विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात Aam Aadmi Party ची माघार ; ‘या’ पक्षाला देणार साथ

आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Elections) येत्या नोव्हेंबरमध्ये पार पडणार आहे. संबंधित निवडणूक ही एकूण २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात होणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तर दोन दिवसांनंतर म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल लागणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, आम आदमी पक्षांनी (Aam Aadmi Party) मात्र माघार घेतली आहे. अशी घोषणा दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी आरोपी असलेले अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केली. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करून भाजपाविरोधी मतांमध्ये फूट पडू नये यासाठी महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक न लढण्याचा पक्षनेतृत्वाचा विचार आहे. वरिष्ठांकडून निवडणूक न लढण्याचे संकेत मिळत आहेत. असे विधान अरविंद केजरीवाल यांनी केले.  (Aam Aadmi Party)

मिळालेल्या माहितीनुसार, इंडि आघाडी (India Alliance) मजबूत करणे, पक्षसंघटना बळकट करणे यावर आप पक्षाकडून भर दिला जात आहे. तसेच पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे परंतु पक्षाच्या वरिष्ठांकडून निवडणूक न लढण्याचे संकेत मिळत आहेत. आम आदमी पक्षाचं लक्ष दिल्लीवर आहे, महाराष्ट्रातील मतदारांच्या मनात आणखी संभ्रम निर्माण करायचा नाही ज्यामुळे भाजपाविरोधी मतांचे विभाजन होऊ शकते असं आप नेत्यांना वाटते. ११ ऑक्टोबर रोजी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक (MP Sandeep Pathak) यांनी दिल्ली निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यालयात बूथ तयारीसाठी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे राज्य ते बुथ स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. संदीप पाठक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सध्या आप पक्षानं दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी लढवणार नाही. एक किंवा दोन विधानसभेच्या जागांसाठी वाटाघाटी करणं व्यर्थ असल्याचं पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. (Aam Aadmi Party)

(हेही वाचा – बविआमध्ये पडली फूट; Hitendra Thakur मविआला देणार पाठिंबा)

दरम्यान, आम आदमी पार्टीने २०१९ ची महाराष्ट्र आणि झारखंड दोन्ही विधानसभा निवडणूक लढवल्या होत्या. त्यावेळी महाराष्ट्रात २८८ पैकी २४ विधानसभा मतदारसंघात आपने उमेदवार उभे केले. त्यातील २३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.       

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.