AAP : आपच्या अडचणी वाढल्या

पक्षाला सोडून जाणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमुळे केजरीवाल त्रस्त झाले आहेत.

222
नेत्यांच्या भाजपा प्रवेशामुळे AAP ला मोठा हादरा

आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. सध्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षांला सोडून जाण्यासाठी छोटे छोटे कारण पुढे करताना दिसून येत आहे. एकीकडे पक्षातील मोठे नेते मनिष सिसोदिया, खासदार संजय सिंग कारागृहात आहेत, तर दुसरीकडे केजरीवाल यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार आहे. अशातच पक्ष सोडणाऱ्याची संख्या वाढल्यामुळे पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. यामुळे सध्या आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) चांगलाच अडचणीत आला आहे. पक्षाला सोडून जाणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमुळे केजरीवाल (Arvind Kejriwal) त्रस्त झाले आहेत. (AAP)

दिल्ली आणि पंजाबनंतर तिसरा सर्वात मोठा पाठिंबा असलेल्या गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला (Aam Aadmi Party) धक्क्यांचा सामना करावा लागत आहे. आमदार भूपत भयानी यांच्या राजीनाम्यानंतर आता भरूचमधील ४० हून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) सोडला आहे. या सर्वांनी मिळून आपले राजीनामे पक्षाकडे पाठवले आहेत. (AAP)

(हेही वाचा – IPL मधील रोहित शर्माची कर्णधार म्हणून कामगिरी)

३३ कार्यकर्ते, १० पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

आपचे प्रमुख इसुदान गढवी, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अमजद खान पठाण यांना लिहिलेल्या अधिकृत पत्रात, पक्षाचे ३३ कार्यकर्ते आणि १० पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा जाहीर केला. विसावदर मतदारसंघाचे आमदार भूपत भयानी यांनी एक दिवसापूर्वी राजीनामा दिला असतानाच या नेत्यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा पक्ष सोडला आहे. (AAP)

दरम्यान, सामूहिक राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) भरूचमधील जिल्हाध्यक्ष पीयूष पटेल म्हणाले की, राजीनामा देणारे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीपासून पक्षात निष्क्रिय होते. यामुळे त्यांना संघटनेत स्थान देण्यात आले नाही. राजीनाम्यासाठी पक्षाच्या लेटरहेडचा गैरवापर करण्यात आल्याचेही पटेल म्हणाले. (AAP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.