दिल्ली महापालिका निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (आप) मोठे यश मिळाले आहे, त्यांनी बहुमताचा आकडा गाठला आहे. एमसीडीमध्ये ‘आप’ला बहुमत मिळाले असले, तरी महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावा केला जात आहे.
https://twitter.com/yaserjilani/status/1600420297769111552?s=20&t=dbVn5DaOVpCHnb_S6Dk9Zg
भाजप धक्कातंत्र वापरणार?
दिल्ली भाजपचे प्रवक्ते तजिंदरपाल सिंग बग्गा यांनी ट्विट केले की, ‘दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा महापौर निवडला जाईल. त्यानंतर सोशल मीडियावर दावा केला जात होता की, एमसीडीमध्ये ‘आप’ला बहुमत मिळाले असले तरी दिल्लीचा महापौर भाजपचाच असेल. यामागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. एक युक्तिवाद असा आहे की, दिल्लीचे राज्यपाल 12 नगरसेवकांना नामनिर्देशित करतील. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या 116 होणार आहे. यासोबतच ‘आप’चे नगरसेवक जास्त असतील, पण ते क्रॉस व्होट करून भाजपला महापौर निवडण्यास मदत करतील, असा तर्कही लोक व्यक्त करतात. त्याचवेळी पक्षांतर विरोधी कायदा नगरसेवकांना लागू होत नसल्याने नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्याची चर्चाही काही जण करत आहेत.
दिल्ली में फिर एक बार भारतीय जनता पार्टी का मेयर बनेगा ।
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) December 7, 2022
(हेही वाचा सीमावादावर राज ठाकरे कडाडले; म्हणाले, महाराष्ट्रातून कोण खतपाणी घालत आहे, सरकारने पहावे…)
असा होऊ शकतो भाजपचा महापौर!
एमसीडी निवडणुकीत पक्षांतरविरोधी कायद्याची अंमलबजावणी न करणे हा आम आदमी पक्षासाठी खरा धोका आहे. सभागृहात पक्षाच्या संमतीशिवाय खासदार आणि आमदार स्वतःहून पक्ष बदलू शकत नाहीत किंवा कोणत्याही मुद्द्यावर मतदान करू शकत नाहीत. तथापि, हा नियम महापौर, नगर परिषद आणि नगरपालिकांचे प्रमुख आणि नगरसेवकांना लागू होत नाही. भाजपने गोवा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात इतर पक्षांच्या आमदारांच्या पाठिंब्याने सहज सरकार स्थापन केले. गोवा आणि मध्य प्रदेशात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता, त्यानंतरही काँग्रेस तिथे सरकार बनवू शकली नाही आणि भाजपने सत्ता काबीज केली. एमसीडी निवडणुकीत ‘आप’ला १३४ जागा मिळाल्या आहेत, तर भाजपला १०४ जागा मिळाल्या आहेत. दिल्ली MCD साठी 4 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या मतदानात एकूण 1,349 उमेदवार उभे होते. एमसीडीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाचा आकडा 126 किंवा त्याहून अधिक असायला हवा.
Join Our WhatsApp Community