आमदारकीचा राजीनामा दिलेल्या ‘आप’च्या (Aam Aadmi Party) आठही आमदारांनी दि. २ फेब्रुवारी रोजी भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मतदानासाठी अवघे चार दिवस बाकी असताना हा पक्षप्रवेश झाल्याने ‘आप’ला जोरदार धक्का बसला आहे.
( हेही वाचा : APMC Market मध्ये हापूसच्या १७५ पेट्या दाखल; ७ ते १२ हजार भाव)
वंदना गौर (Vandana Gaur) (पालम), रोहित मेहरौलिया (त्रिलोकपुरी), गिरीश सोनी (मादीपुरी), मदन लाल (कस्तुरबा नगर), राजेश ऋषी (उत्तम नगर), बीएस जून (बिजवासन), नरेश यादव (मेहरौली) आणि पवन शर्मा (आदर्श नगर) हे ‘आप’चे आमदार भाजपमध्ये सामील झाले आहेत. ‘आप’च्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा दिल्यानंतर या आठही आमदारांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे आमदारकीचाही राजीनामा दिला. त्यानंतर भाजपाचे उपाध्यक्ष वैजयंत पांडा आणि दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा (Virendra Sachdeva) यांच्या उपस्थितीत या आमदारांनी भाजपात प्रवेश केला. (Aam Aadmi Party)
याप्रकरणी भाजपाचे उपाध्यक्ष वैजयंत पांडा (Baijayant Panda) म्हणाले की, ‘आप’ला रोखण्यात यश आल्याने आजचा दिवस ऐतिहासिक आहे. ५ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानानंतर दिल्ली त्यांच्यापासून मुक्त होईल, असेही पांडा म्हणाले. तसेच दिल्लीत सरकार असलेल्या पक्षाविरोधात जोरदार हवा आहे. हे ३ जी सरकार आहे, ज्यात घपला, घुसपैठियोंको पनाह आणि घोटाला या तीन ‘जी’चा समावेश आहे. विरोधात हवा असल्याची कल्पना या पक्षाच्या नेत्यांना आली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले. (Aam Aadmi Party)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community