आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक ‘इंडिया’ (AAP Party) आघाडीच्या रुपात एकत्र आले आहेत. २०२४ साली होणाऱ्या या निवडणुकीत हे सर्व पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. या पक्षांत राष्ट्रीय पातळीवर युती झालेली असली तरी, राज्य पातळीवर मात्र मतभेद अद्याप कायमच आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतात. असे असतानाच आम आदमी पार्टी अर्थात आप पक्षाने आम्ही बिहारची विधानसभा निवडणूक लढवणार आहोत, अशी भूमिका घेतली आहे.
लोकसभा निवडणुका आठ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर एनडीए आणि विरोधकांची इंडिया (AAP Party) आघाडी आपापली तयारी करत आहेत. इंडिया आघाडीतील २६ पक्ष आपण एक आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करत असले तरीही त्यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याची स्थिती आहे. याचं कारण म्हणजे आम आदमी पक्षाने बिहार विधानसभा निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीमध्ये कितपद ऐकी राहील हा प्रश्नच आहे.
(हेही वाचा – Food Poisoning : सांगलीमधील एका आश्रमशाळेत १७० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा)
बिहारमध्ये ‘आप’ला मजबूत करण्यावर भर
आम आदमी पक्षाने (AAP Party) शनिवारी (२६ ऑगस्ट) बिहारमध्ये विधानसभा निवडणुका लढण्याची घोषणा केली. बिहारमध्ये २०२५ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आपचे प्रमुख सचिव संदीप पाठक यांनी बिहारमधील नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक घेतली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीवेळी, संदीप पाठक यांनी बिहारमध्ये ‘आप’ला मजबूत करण्यावर भर दिला. यावेळी आपचे बिहारमधील प्रमुख अजिश यादव हेही उपस्थित होते.
बिहारमधील गलिच्छ राजकारणामुळे राज्य मागे पडले आहे. बिहारमध्ये आम्ही विधानसभा (AAP Party) लढणार आहोत. पण, निवडणुका लढण्याआधी संघटना मजबूत असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत, असं पाठक म्हणाले. गुजरातमध्ये लढल्याप्रमाणे बिहारमध्येही पूर्ण शक्तीने आम्ही निवडणूक लढवू. त्याआधी पक्ष स्थानिक निवडणुका लढवेल, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community