आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी शुक्रवारी दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवण्यासाठी तीस हजारी न्यायालयात हजेरी लावली. सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत त्यांचा जबाब नोंदवला गेला. याआधी गुरुवारी रात्री ११ वाजता दिल्ली पोलीस आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत एम्समध्ये पोहोचले होते. जिथे त्यांचे मेडिकल झाले. काल गुरुवारी त्यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांच्या नावाचा एफआयआरमध्ये समावेश आहे. (AAP)
हल्ल्याच्या वेळी उपस्थित पोलिस कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासाठी आणि त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी दिल्ली पोलिस मुख्यमंत्र्यांच्या घरी जाण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या घरी ज्या कंपनीने सीसीटीव्ही लावले आहेत, त्यांचीही मदत पोलीस घेणार आहेत. केजरीवाल यांच्या घराबाहेर आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलिस घटनेशी संबंधित सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत. (AAP)
(हेही वाचा – Online Froud : फेडेक्स कुरिअरच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक, राजस्थानमधून एकाला अटक)
या प्रकरणातचा व्हिडिओ समोर, दिल्ली पोलिस तपास करणार
समोर आलेला व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा स्वाती बिभवशी वाद झाल्यानंतर सोफ्यावर बसलेल्या आहेत. बिभव बाहेर आला आणि दिल्ली पोलिसांनी तैनात केलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आत पाठवले. बिभवने कर्मचाऱ्यांना स्वाती मालीवाल यांना बाहेर काढण्यास सांगितले. (AAP)
व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या लोकांमध्ये बिभव नाही. ते सुरक्षा कर्मचारी आहेत. हे लोक स्वाती यांना बाहेर जाण्यास सांगत आहेत. तेव्हा स्वाती रागाने म्हणाल्या की, मी दिल्ली पोलिसांना फोन केला आहे. पोलिस आल्यावरच जाईन. मात्र हा व्हिडिओ खरा आहे की खोटा हे अजूनही स्पष्ट झालेले नाही, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच बिभव कुमार यांना महिला आयोगाने देखील उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. (AAP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community