- प्रतिनिधी
शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विधानसभेची पुढील निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सिल्लोड मतदारसंघातील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान करून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले आहे. सत्तार यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा करताना विकासाच्या मुद्द्यांपेक्षा जातीयवादाला अधिक प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप केला.
सिल्लोड नगरपरिषदेची निवडणूक शेवटची लढत
सत्तार (Abdul Sattar) यांनी जाहीर केले की सिल्लोड नगरपरिषद निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक असेल. त्यांनी म्हटले, “राजकारणाचा हेतू विकास असावा, परंतु जातीपातीच्या मुद्द्यांना जास्त महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे मी निवडणूक लढवणार नाही.”
(हेही वाचा – Beed NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त)
मुलाला संधी देण्याची तयारी
सत्तार (Abdul Sattar) यांनी आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्यावरही संकेत दिले. “मी माझ्या मुलाला सांगितले आहे की तुला निवडणूक लढवायची असेल, तर तू लढ,” असे त्यांनी जाहीर केले. या विधानामुळे सत्तार यांच्या घराणेशाही राजकारणाच्या तयारीची चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
सत्तार (Abdul Sattar) यांच्या या निर्णयामागील कारणे काय, यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. काहींच्या मते, सत्तार यांनी आपल्या मुलाला पुढे आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, स्थानिक राजकारणात वाढलेल्या तणावामुळे त्यांनी माघार घेतली असावी, असेही बोलले जात आहे.
सिल्लोडमधील राजकीय समीकरणे
सत्तार (Abdul Sattar) यांच्या राजकीय निर्णयामुळे सिल्लोडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी मुलाला संधी दिल्यास स्थानिक मतदारांचा प्रतिसाद कसा असेल, याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
सत्तार (Abdul Sattar) यांच्या घोषणेमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटासोबतच त्यांच्या मुलाच्या राजकीय प्रवेशाची नांदी झाली आहे. पुढील काळात या निर्णयाचा राजकीय परिणाम कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community