कृषीमंत्री अब्दुल सत्तार बीड दौर्यावर पीक नुकसान पाहणीसाठी गेले असताना त्यांचं वक्तव्य वादग्रस्त ठरवण्यात आलं. होय! वक्तव्य वादग्रस्त नव्हतं, परंतु ते वादग्रस्त ठरवण्यात आलं. या दौर्या दरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत कार्यकर्ते चहा घेत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी चहा नको असं म्हटलं व त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, “तुम्ही दारु पिता का?”
( हेही वाचा : केंद्र सरकारने दिलेला नवा प्रकल्प ३२ महिन्यांत पू्र्ण होणार – उदय सामंत )
आता अब्दुल सत्तार यांचा हा व्हिडिओ कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट केला आहे. गंमत म्हणजे यावर आदित्य ठाकरे यांना लगेच नैतिकता आठवली आणि त्यांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. एका विधानामुळे आदित्य ठाकरे राजीनामा मागतात आणि अत्यंत हीन कर्म केल्यावर मात्र पाठिंबा देतात. आदित्य ठाकरे यांच्या या मानसिकतेला काय म्हणावं? नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्यात आला नव्हता.
अनिल देशमुख यांच्यावर बार मालकांकडून १०० कोटी रुपयांची वसुली केल्याचे आरोप होते, त्यासाठी आता ते तुरुंगाची हवा खात आहेत, तरी आदित्य ठाकरे यांच्या बाबांचं सरकार असताना अनिल देशमुख यांना आदित्य ठाकरेंचा मूक पाठिंबा होता. अब्दुल सत्तार यांनी केलेलं वक्तव्य गंमत म्हणून होतं. त्यात त्यांनी कोणालाही दारु प्यायला आमंत्रण दिलं नव्हतं. हे मैत्रीपूर्ण संवाद होते. असे संवाद आपण रोजच्या जीवनात गंमत म्हणून सहज म्हणून जातो. याचं भांडवल सचिन सावंत यांनी केलं आणि आदित्य ठाकरेंना लगेच संस्कार आठवले.
पण हे संस्कार अनिल देशमुख, सचिन वाझे यांच्याबाबत कुठे फिरायला गेले होते? याचं उत्तर आदित्य ठाकरेंकडे आहे काय? आदित्य ठाकरेंच्या वागणुकीवरुन असं वाटतं की गंमत म्हणून केलेलं विधान त्यांच्यासाठी गुन्हा असतो आणि गंभीर गुन्हा ही त्यांच्यासाठी गंमत असते. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असं वागू शकतात यावर खरंच विश्वास ठेवता येत नाही. सध्या आदित्य ठाकरे आक्रमक होण्याच्या नादात आपल्या आदित्य ठाकरे आपल्या आजोबांचे संस्कार विसरत चालले आहेत. असंगाशी संग केल्याचा हा परिणाम तर नव्हे.
Join Our WhatsApp Community