केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये दि. ३ ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा (Marathi Abhijat Bhasha) दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर दि. ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने मुंबईतील बीकेसी येथे ‘अभिजात मराठी सन्मान सोहळा’ (Abhijat Marathi Sanman Sohala) आयोजित केला आहे. याकार्यक्रमाला महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिक, कलाकार उपस्थित राहणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर असल्याने ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सुरुवातीला त्यांच्या दि. ५ ऑक्टोबर रोजीच्या दौऱ्यात या कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र सकाळी ९ वाजता वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
( हेही वाचा : Earthquake: नवापूर तालुक्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण)
दरम्यान मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेताना यासोबतच प्राकृत, पाली, मराठी, बंगाली, आसामी या भाषेनाही अभिजात भाषेचा (Marathi Abhijat Bhasha) दर्जा देण्यात आला. केंद्र सरकारच्या अधिवेशनात ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यात आल्याची प्रतिक्रिया मराठी साहित्यिकांनी दिली होती.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community