बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून बिचुकले (Abhijit Bichukale) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीतही अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. परंतु, तिथून त्यांचं डिपॉजिट जप्त झालं. (Abhijit Bichukale)
दोन रुपयाची दारू पाजून, मटण देऊन शक्ती प्रदर्शन केलं जात नाही
अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी आपली उमेदवारीचा घोषणा करताना खासदार म्हणून निवडून आल्यावर कोणती कामे करणार हे स्पष्ट केले. 2004, 2009, 2014, 2019 च्या निवडणुकीत मला चांगला पाठिंबा दिला. आता देखील मी निवडणूक अर्ज दाखल केला असून मतदारराजा जागृत झाला पाहिजे असे अभिजित बिचुकलेंनी (Abhijit Bichukale) म्हटले. दोन रुपयाची दारू पाजून, मटण देऊन शक्ती प्रदर्शन केलं जात नाही असा टोलाही बिचकुलेंनी लगावला आहे. (Abhijit Bichukale)
मी १९ तारखेला अर्ज भरणारच
अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) म्हणाले, “मी एकच गोष्ट सांगतो की मी १९ तारखेला अर्ज भरणारच. भाजपाकडून तिकीट मिळावं अशी उदयनराजेंची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली. पण भाजपावाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिलाय याचं आत्मपरिक्षण उदयनराजेंनी केलं पाहिजे. त्यानंतर लोकांनी त्यांचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. शक्तीप्रदर्शन काय असतं? शक्ती लोकांनी युद्धात दाखवली पाहिजे. मटण देऊन शक्ती दाखवली जात नाही.” असं ते म्हणाले. (Abhijit Bichukale)
हे पहा –
Join Our WhatsApp Community