Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर दहिसरमध्ये गोळीबार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोळीबारांच्या घटनेत वाढ झालेली दिसून येत आहे. अशातच अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे चर्चांना उधाण आले आहे.

390
Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर दहिसरमध्ये गोळीबार

शिवसेना ठाकरे गटाचे दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. गुरूवारी रात्री घडलेल्या या घटनेत त्यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. सध्या अभिषेक घोसाळकर यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिषेक घोसाळकर हे शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचे पुत्र आहेत.

(हेही वाचा – India Maldives : आता मालदीवमध्ये भारत नियुक्त करणार ‘सक्षम तांत्रिक कर्मचारी’)

सध्या अभिषेक घोसाळकर यांच्या प्रकृतीबद्दल कुठलीही माहिती समोर आलेली नाही. घोसाळकर यांच्यावर गोळीबार का केला? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली आहे.

(हेही वाचा – Maharashtra School : आता मुलांच्या झोपेची चिंता मिटली; चौथीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी 9 वाजल्यापासून)

पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मुरीस भाई नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणवून घेतो. एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. अशातच मॉरिस याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर स्वतःला गोळी मारून घेतल्याची चर्चा आहे, मात्र याला दुजोरा मिळू शकलेला नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.