Abhyudaya Nagar Redevelopment : अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी म्हाडाची निविदा; मिळणार ६३५ चौरस फुटाचे घर

124
Abhyudaya Nagar Redevelopment : अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी म्हाडाची निविदा; मिळणार ६३५ चौरस फुटाचे घर
Abhyudaya Nagar Redevelopment : अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी म्हाडाची निविदा; मिळणार ६३५ चौरस फुटाचे घर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई
अभ्युदय नगर (काळाचौकी) म्हाडा वसाहतीच्या समहू पुनर्विकासासाठी बांधकाम व विकास (Construction & Development) या तत्वावर विकासक नेमण्यासाठी मुंबई मंडळातर्फे निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासनाच्या उच्चाधिकार समितीने दिलेल्या मान्यतेनंतर पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Abhyudaya Nagar Redevelopment)
अभ्युदय नगर, काळाचौकी वसाहतीत १,३३,५९३ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर सद्यस्थितीत ४८ इमारती असून   २०८ चौरस फूट आकारमानाच्या ३४१० सदनिका आहेत. सुमारे १५ हजार रहिवाशांना या पुनर्विकास प्रकल्पाचा फायदा होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या इमारतींच्या विकासाची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे सोपविण्यात आली आहे. त्यानंतर मंडळातर्फे अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास प्रक्रिया सी अँड डी प्रारूपानुसार  करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Abhyudaya Nagar Redevelopment)
अनेक वर्ष प्रलंबित राहिलेल्या या प्रकल्पाचा तिढा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या मध्यस्थीने सुटला.  अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाची निविदा काढतांना उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनेनुसार या पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्रफळ किमान ६३५ चौरस फूट असावे, भविष्याच्या दृष्टीने प्रत्येक सदनिकाधारकाला चारचाकी वाहन पार्किंग असावी, अशा अटी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. (Abhyudaya Nagar Redevelopment)
प्रत्येक सदनिकाधारकाला पाच लाख रुपये कोर्पस फंड एकदाच देण्याची अट निविदेत आहे. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रति सदनिकाधारक वीस हजार रुपये प्रति माह भाडे विकासकाने देण्याचीही अटही या निविदेत टाकण्यात आली आहे. (Abhyudaya Nagar Redevelopment)
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी गेल्याच महिन्यात अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे सादरीकरण येथील रहिवाशांसमोर करुन प्रकल्पाविषयी माहिती दिली होती. निविदा वेळापत्रकानुसार तांत्रिक बोली निविदा २२ नोव्हेंबर, २०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजता उघडण्यात येणार आहे. (Abhyudaya Nagar Redevelopment)
हेही पहा-  
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.