5 राज्यांची निवडणूक : यंदा भाजपचे काय होणार? काय सांगतो सर्वे?

166

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार निवडणूक पूर्व सर्वे समोर येवू लागले आहेत. यंदा या पाच राज्यांत भाजपला जास्त मेहनत घ्यावी लागणार असे आकडे सांगत आहेत. आगामी पाच राज्यांपैकी तीन राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. एबीपी न्यूज सी वोटरनं पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण केले आहे.

काय सांगतो सर्वे?

उत्तर प्रदेश – 2017 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेसचा सुपडा साफ करत भाजपनं 300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला होता. मोदी लाटेत स्वार झालेल्या भाजपने 2017 च्या निवडणुकीत 47 वरुन थेट 312 जागांवर मजल मारली होती. तर अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीची 224 वरुन 47 जागांवर घसरण झाली होती. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जवळपास 100 जागांचा तोटा होण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये भाजपनं नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होती. तर यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचं परीक्षणही मतदार करत असल्याचं या सर्व्हेतून पाहायला मिळत आहे. यंदा भाजपला 223 ते 235 जागा मिळण्याची शक्यता या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. तर 2017 च्या तुलनेत समाजवादी पार्टीला 100 जागा अधिक मिळून, 145 ते 157 जागांवर विजयाचा अंदाज व्यक्त केला जातोय. तर काँग्रेसला मात्र केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावं लागेल असं या ओपिनियन पोलमध्ये सांगितलं गेलं आहे.

गोवा – 2022 मध्ये भाजपनं 22 जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलंय. ते सत्यात उतरेल असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. मात्र भाजपला 20 आमदार निवडून आणतानाही प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे, असेही बोललं जात आहे. तर दुसरकीडे काँग्रेसला मोठा फटका बसेल असा अंदाज वर्तवला जात आहे. काँग्रेसला अवघ्या चार ते आठ जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे एमजीपी आणि तृणमूल काँग्रेस मिळून दोन ते सहा जागा जिंकू शकतात. तर आम आदमी पार्टी तब्बल पाच ते नऊ जागी जिंकू शकते, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. अपक्ष आमदार गोव्यात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत आले आहे. त्या पार्श्वभूमीवर चार अपक्ष आमदार जिंकू शकतात, अशीही शक्यता सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे.

मणिपूर – मणिपुराच रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे. मणिपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना होईल, अशी शक्यता असून भाजपला 23 ते 27 तर काँग्रेसला 22 ते 26 जागा मिळतील अशी शक्यता आहे. तर एनपीएफला दोन ते सहा तर अपक्ष पाच ते नऊ जागी निवडून येण्याची शक्यता सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे.

पंजाब – पंजाबमध्ये आपला चाळीस टक्के तर काँग्रेसला 36 टक्के मतं मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आम आदमी पार्टीला 52-58 इतक्या जागा मिळतील, तर काँग्रेसला 37 ते 43 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला एक ते तीन जागी विजय मिळू शकतो, अशी शक्यता आहे. तर अकाली दल 17 ते 23 जागी बाजी मारेल, असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे.

उत्तराखंड – उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपात अटीतटीची लढत होईल अशी शक्यता आहे. वर्तवण्यात आलेल्या अंदाजनुसार, भाजपला 39 तर काँग्रेसला 37 टक्के मत मिळू शकतात. दरम्यान, आपला तेरा तर इतरांना अकरा टक्के मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.