समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उबाठासोबत आपण राहणार नाही, अशी भूमिका ही अबु आझमी (Abu Azmi) यांनी घेतली. मुळात विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला. ज्यामुळे मविआतील (Maha Vikas Aghadi) घटक पक्षही तशीच भुमिका घेतील अशी शक्यता होती. मात्र सपाचे नवनिर्वाचित आमदार अबु आझमी (Abu Azmi) आणि रईस शेख (Rais Shaikh) यांनी आमदारकीची शपथ घेतली. त्यामुळे मविआमध्ये फुट पडल्याचे उघड झाले. परंतु राष्ट्रीय स्तरावर सपा पक्ष इंडी आघाडीत राहिल का नाही? हे अद्याप सपाच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. (Maha Vikas Aghadi)
( हेही वाचा : अपमान सहन न झाल्याने Aaditya Thackeray सभागृहातून बाहेर गेले?)
शिवसेना उबाठाचा हिंदुत्वाचा मुद्दा खटकला
दरम्यान आमदार अबु आझमी म्हणाले की, शिवसेना उबाठाने विधानसभेतील पराभवानंतर आपल्या विचारधारेत बदल केलेला आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सांगितले की, माझा हिंदूंत्वाचा मुद्दा कायम राहिलं. त्यामुळे त्यांनी संपूर्ण देशाला नव्हे तर फक्त हिंदूंत्वाच्या मुद्द्याला पुढे घेऊन जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान ज्या ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद पडली, त्या दिवशी मशिद पाडणाऱ्यांचे शुभेच्छा उबाठा शिवसेनेने दिल्या आहेत. त्यामुळे आमच्या जखमांना वारंवार हिरवे केले जात असून अशा लोकांसोबत आम्ही आघाडीत राहू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका अबु आझमी (Abu Azmi) यांनी घेतली. तसेच मविआला अपयश मिळाल्याने आम्ही साथ सोडली असून विचारसणीमुळे सपा मविआसोबत राहू शकत नाही. महापलिका निवडणुकीसाठी सर्वच निवडणुकीसाठी आम्ही मविआतून नसून मात्र इंडी आघाडीत सपा असेल का? हे अखिलेश यादव ठरवतील, असेही आझमी (Abu Azmi) म्हणाले. (Maha Vikas Aghadi)
अबु आझमींच्या (Abu Azmi) या निर्णयामुळे मविआचे संख्याबळ दोनने कमी झालेले आहे. आझमी यांनी अखिलेश यादव यांच्याशी कोणतीही चर्चा न करता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे. कारण हिंदूत्वाच्या मुद्याला बगल देऊन डाव्या विचारसरणीच्या पक्षांसह आघाडी करणाऱ्या शिवसेना उबाठाला आघाडीतील पक्षानेच जोरदार दणका दिला आहे. ज्यामुळे विधानसभेनंतर महाविकास आघाडीत फुट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. (Maha Vikas Aghadi)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community