Abu Azmi : वंदे मातरम् म्हणण्यास अबू आझमींचा नकार; विधानसभेत गोंधळ

271
Abu Azmi : वंदे मातरम् म्हणण्यास अबू आझमींचा नकार; विधानसभेत गोंधळ
Abu Azmi : वंदे मातरम् म्हणण्यास अबू आझमींचा नकार; विधानसभेत गोंधळ

‘आमचा धर्म आम्हाला कोणासमोरही झुकण्यास मान्यता देत नाही. आम्ही आमच्या आईपुढेही शीर झुकवत नाही. त्यामुळे आम्ही वंदे मातरम् म्हणणार नाही,’ असे वादग्रस्त विधान आमदार अबू आझमी यांनी बुधवारी विधानसभेत केले. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला आणि कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

रामनवमीला संभाजीनगरमध्ये घडलेल्या दंगलीसंदर्भात अबू आझमी यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. यावेळी आझमी म्हणाले की, आफताब पूनावला याने एका मुलीची हत्या करून मृतदेहांचे तुकडे केले आणि ते फ्रिज मध्ये ठेवले. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात मुसलमानांविरोधात वातावरण पेटले.

महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यात सकल हिंदू आक्रोश रॅली काढण्यात आली. याद्वारे मुस्लिमांना इतके अपमानित केले गेले, की जसे काही या देशात मुसलमान सगळ्यात मोठे देशद्रोही आहेत. औरंगाबाद येथील २९ मार्च २०२३ रोजी घडलेल्या घटनेचा उल्लेख करून आझमी म्हणाले की, संध्याकाळी ५ वाजता राम मंदिराजवळ तीन युवक मोटारसायकलवर आले. त्यांनी तिथे घोषणा दिल्या की, तुम्हाला (मुसलमान) वंदे मातरम् म्हणावे लागेल.

(हेही वाचा – आमदारांच्या अधिकारांवर न्यायालयाला अतिक्रमण करू देणार नाही; विधानसभा अध्यक्षांची ग्वाही)

“पण आम्ही वंदे मातरम् म्हणू शकत नाही. कारण आम्ही फक्त एकच अल्लाहला मानतो. आम्ही जगामध्ये कोणाच्याही पुढे आमचं मस्तक झुकवत नाही. आम्ही आमच्या आईपुढेही आमचे मस्तक झुकवत नाही. आमचा धर्म आम्हाला कुठल्याही व्यक्तीपुढे झुकण्यास मान्यता देत नाही, सहमती देत नाही,” असे वक्तव्य आझमी यांनी करताच सभागृहात प्रचंड गोंधळ झाला.

कामकाज तहकूब

शिवसेना-भाजपाच्या आमदारांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांना शांत होण्यास सांगितले. मात्र, सभागृहात गोंधळ सुरूच होता. अध्यक्षांनी अबू आझमी यांना लक्षवेधीतील मुद्द्याच्या पलीकडे जाऊन बोलू नका, असे निर्देश दिले. मात्र अध्यक्षांच्या निर्देशांचे पालन न करता आझमी आपली भूमिका दामटवत राहिले. त्यामुळे सभागृहात गोंधळ वाढल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.