चिथावणीखोर भाषणांवरून Nitesh Rane यांनी अबू आझमींना सुनावले; म्हणाले, अशी वेळ…

119
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) शेवटच्या दिवशी म्हणजेच २१ डिसेंबरला सभागृहामध्ये समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि महायुती सरकारमधील मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Fisheries and Ports Minister Nitesh Rane) हे आमने सामने आले. अबू आझमी (Abu Azmi) यांनी नितेश राणे यांचं नाव न घेता चिथावणीखोर भाषणांचा उल्लेख केला आणि धर्म आणि महापुरुषांविरोधात होणाऱ्या भाषणांविरोधात कठोर कायदा आणण्याची मागणी केली. यावेळी प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी आक्रमक होत अबू आझमी यांनी भाईचाऱ्याची ही शिकवण जर फतवे काढणाऱ्यांना दिली असती तर आज अशी भाषणं द्यायची वेळ आली नसती, असा टोला लगावला. (Nitesh Rane)

नेमकं काय म्हणाले अबू आझमी? 
साहेब म्हणतात मशिदीत घुसून मारू, का मारणार आमची काय चूक आहे? मी कुराण वाचू देणार नाही, मी स्पीकर बंद करेल. अध्यक्ष मोहोदय हा देश हिंदू आणि मुस्लिमांच्या प्रेमाचा देश आहे. इथे सर्व एकत्र राहातात. प्रेम करा असं आमची संस्कृती आम्हाला शिकवते, जेव्हा दिवाळी आणि होळी येते तेव्हा मुस्लीम बांधव हिंदू बांधवांना शुभेच्छा देतात. जेव्हा ईद असते तेव्हा हिंदू बांधव मुस्लिमांना शुभेच्छा देतात, असं आझमी यांनी म्हटलं.

(हेही वाचा – २२ डिसेंबरला National Mathematics Day 2024 का साजरा केला जातो ?)

नितेश राणे यांचं उत्तर  
यावर बोलताना नितेश राणे यांनी म्हटलं की, अबू आझमीजी जे भाईचारा वगैरे बोलत आहेत त्यात चुकीचं काही नाही. पण ते चुकीची माहिती देत आहेत. दुसरी बाजू समजून घेत नाहीत. गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर कोण दगड मारतं? आमचे मंदिर कोण तोडतं? हे भाईचाऱ्याचे लेक्चर जर त्यांनी फतवा काढणाऱ्या लोकांना वेळत दिले असतेना तर अशी भाषण देण्याची वेळ आली नसती. या सगळ्या गोष्टी अध्यक्ष मोहोदय त्यांना निट समजून सांगा, आम्हाला त्यांचं भाषण ऐकायचं आहे, आता आम्ही मंत्री झालो आहोत आता आम्ही ऐकणार नाही. पण त्यांनी वस्तुस्थिला धरून बोलाव. खरी परिस्थिती काय आहे? ही महाराष्ट्रातील जनता ओळखते असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.