उद्धव ठाकरेंची साथ सोडून 40 आमदारांनी एकनाथ शिंदेंची सोबत दिली, मात्र उरलेल्या 15 आमदारांचे भवितव्य आता धोक्यात आहे. याची प्रचिती शुक्रवारी, 7 ऑक्टोबर रोजी आली. कारण कणकवलीचे आमदार वैभव नाईक यांची एसीबीमार्फत चौकशी झाल्याचे समोर आले आहे.
काय आहे प्रकरण ?
शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर आता ठाकरे गटाच्या निष्ठावंत आमदारांवर चौकशीचा फास आवळला जात असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. मात्र, या प्रकारामुळे जिल्हा शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. कुडाळ मालवण मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार आणि मधल्या सत्तांतराच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरी एसीबीच्या पथकाकडून आज कणकवली शासकीय विश्रामगृहावर चौकशी करण्यात आली. याबाबतचा तपशील एसीबीकडून देण्यात आला नसला तरी वैभव नाईक यांनी अशा कितीही चौकशीला समोर जावे लागले आहे, ज्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान एसीबीचे पोलीस उपाधीक्षक सुशांत चव्हाण यांनी वैभव नाईक यांना १२ ऑक्टोबर पर्यंत खर्च आणि मालमत्तेचे विवरणपत्र सादर करण्याचे लेखी पत्र यावेळी दिले आहे.
Join Our WhatsApp Community