सध्या अचानक राजकीय नेत्यांचे रस्ते अपघात होऊ लागले आहेत, ज्यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच खेडचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात झाला. सुदैवाने यात आमदार कदम सुरक्षित आहेत, मात्र यावर आता माजी मंत्री रामदास कदम यांनी आपल्या मुलाच्या अपघातामागे घातपाताचा संशय आहे, असा आरोप केला आहे.
आमदार कदम यांना Y+ ची सुरक्षा
आमदार कदम यांच्या गाडीला डम्परने जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीच्या मागील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झाला. सुदैवाने यात योगेश कदम सुखरुप वाचले, मात्र त्यांच्या चालकाला आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाला दुखापत झाली आहे. योगेश कदम यांना Y+ सुरक्षा आहे. त्यांच्या गाडीसोबत पोलिसांची गाडी होती. अपघात झालेल्या ठिकाणी यापूर्वी अनेकदा अपघात झाले. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक अपघात सातत्याने होत आहे. त्यानंतरही दखल घेतली जात नाही. अपघाताचा पॅटन साधारण अपघातासारखा नाही. माझ्या गाडीच्या मागेपुढे पोलिसांची गाडी असताना डप्परने धडक दिली. त्यामुळे शंका घेण्यास मोठा वाव असल्याचे आमदार कदम यांनी सांगितले. दरम्यान या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांकडे अपघाताच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे आमदार योगेश कदम म्हणाले.
(हेही वाचा # Exclusive शिवसेना कुणाची? निवडणूक आयोग घेणार आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची ओळख परेड)
Join Our WhatsApp Community