Mamata Banerjee : लोकसभा स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यावर काही तासांतच ममता बॅनर्जींच्या वाहनाला अपघात

437

लोकसभा निवडणूक आपण इंडी आघाडीसोबत न लढत स्वबळावर लढणार आहे, अशी घोषणा करून ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी इंडी आघाडीला जोरदार धक्का दिला. मात्र त्यानंतर काही तासांतच त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.

धुक्यामुळे झाला अपघात

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या कोलकाता येथे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासह जात होत्या. यावेळी त्यांच्या कारला अपघात झाला. यामध्ये ममता यांच्या डोक्याला मार लागला आहे. बर्धमानहून ममता या कोलकाता येथे परतत होत्या. यावेळी पाऊस सुरु होता. या पावसामुळे धुक्याचे वातावरण पसरले होते. ममता यांच्या ताफ्यातील कार चालकाला पुढचे काही दिसत नसल्याने ब्रेक मारला. त्यामुळे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या चालकालाही अचानक ब्रेक मारावा लागला. यात ममता यांचे डोके पुढील डॅशबोर्डवर आदळले. यामुळे ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली. बर्धमानला त्या एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी गेल्या होत्या. त्या तिथून हेलिकॉप्टरने परतणार होत्या. परंतु खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरने जाता आले नाही. यामुळे त्यांनी रस्ते मार्गे परतण्याचा निर्णय घेतला होता.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.