मेटेंचे अपघाती निधन; महामार्ग पोलिसांची ‘गोल्डन अवर्स’ संकल्पना कागदावर?

103
अपघातात जखमी होणाऱ्याना एका तासांच्या आत वैद्यकीय मदत मिळाल्यास त्यांचे प्राण वाचवले जाऊ शकतात, अपघातातील जखमी साठी हा ‘गोल्डन अवर्स’ मानला जातो. राज्य महामार्ग पोलिसांनी ६ वर्षांपूर्वी राबवलेली गोल्डन अवर्स संकल्पना शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या वाहनाच्या अपघात दरम्यान कुठे गेली असा प्रश्न अनेकां कडून विचारला जात आहे.
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे हे मुंबईच्या दिशेने येत असताना पुणे मुंबई महामार्गावरिल खोपोली नजीक त्यांच्या वाहनाचा रविवारी पहाटे ५ वाजून५ मिनिटांनी अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे हे, त्यांचा अंगरक्षक हे गंभीररीत्या जखमी झाले होते व चालक एकनाथ कदम हा किरकोळ जखमी झाला होता. अपघात झाल्यानंतर चालकाने मोटारी बाहेर येऊन मदत मागितली मात्र एकही वाहन त्यांच्या मदतीसाठी थांबले नाही, त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन लावला मात्र फोन लागला नाही. ५ वाजून ५८ मिनिटांनी या अपघाताची माहिती महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांना मिळाली, पळस्पे महामार्ग पोलीस केंद्राचे पथक ६ वाजून ५ मिनिटांनी अपघातास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमी विनायक मेटे व त्यांचे अंगरक्षक आणि वाहन चालक यांना तात्काळ आयआरबी रुग्णवाहिनेतून कामोठे येथील  एमजीएम रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी विनायक मेटे यांना तपासून मृत घोषित केले. व अंगरक्षक आणि चालक कदम यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कुठे गेली गोल्डन अवर्सची संकल्पना ?

महामार्ग तसेच इतर ठिकाणी रस्ते अपघातात जखमी होणाऱ्याना एका तासांत वैद्यकीय मदत मिळाली तर त्यांचे प्राण वाचण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे हा एक तास जखमींसाठी गोल्डन अवर्स मानला जातो. अपघातात जखमी होणाऱ्याना एका तासात मदत मिळावी म्हणून राज्य महामार्ग पोलिसांनी २०१६ मध्ये ‘गोल्डन अवर्स’ संकल्पना राबवली होती. मात्र विनायक मेटे यांच्या अपघाताच्या वेळी गोल्डन अवर्स संकल्पना कुठे गेली असा प्रश्न विचारला जात आहे.

महामार्ग पोलीस केंद्र ….

राज्य महामार्ग पोलिसांचे विविध केंद्र असून या केंद्रात पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी देण्यात आले आहे. या अधिकाऱ्याने आपल्या पथकासह आपल्या केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या महामार्गवर गस्त घालत वाहतूक कोंडी सोडवणे, अपघात रोखणे, अपघाताच्या ठिकाणी मदतीसाठी तात्काळ दाखल होऊन जखमींना वैद्यकीय मदत करणे, लेनची शिस्त न पाळणाऱ्यावर कारवाई करणे ही जबाबदारी महामार्ग पोलिसांची आहे. मात्र विनायक मेटे यांच्या वाहनाचा अपघात झाला त्यावेळी महामार्ग पोलीसाना अपघाताची माहिती उशिरा का मिळाली ? महामार्ग पोलीसावर गस्तीवर नव्हते का? महामार्गवरील सीसीटीव्ही कॅमऱ्यांचे नियंत्रण कक्षातील यंत्रणा काय करीत होती असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहे.
याबाबत संबंधित अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.