आता फोनवर हॅलो नाहीतर वंदे मातरम् म्हणा; काय आहे शासनाचा नवा GR?

153

नुकताच शासनाकडून एक नवा जीआर काढण्यात आला आहे. यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना फोन उचलल्यानंतर हॅलो न बोलता वंदे मातरम् असं म्हणावे लागणार आहे. मात्र या निर्णयामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असताना, याबाबत माहिती देताना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले केसरकर

आपण वंदे मातरम् का म्हणतो तर देशाच्या प्रति असलेल्या आपल्या भक्तिचं ते प्रतिक आहे. त्यामुळे यामध्ये काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही. आमच्या सत्राची जेव्हा सुरूवात होते. तेव्हा आम्ही वंदे मातरम् म्हणतो आणि सांगता राष्ट्रगीताने करतो, असं दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा हिंसाचार! दोन क्लबचे समर्थक भिडले, 129 जणांचा बळी)

तसेच पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, शासनाने आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचा जीआर काढला आहे. याबाबत नागरिकांच्या अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यांना समजून सांगावं लागतं आणि आम्ही ते करू, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. वंदे मातरम् हे देशाच्या प्रति असलेल्या आपल्या भक्तिचं एक प्रतिक आहे. त्यामुळे याचे पालन करणं काही चुकीचे नाही.

काय आहे नवा जीआर

सरकारी अध्यादेशात म्हटले की, भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात साजरा होत आहे. याचे औचित्य साधून शासकीय कार्यालयातील दूरध्वनी तसेच मोबाईलवर पाहुण्यांशी किंवा सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत संभाषणाची सुरुवात ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ने होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.