धारावीत एका अनधिकृत शाळेला (School) मान्यता देण्यात आली, त्याविषयी शालेय शिक्षण विभागाने उपविभागीय शिक्षण उपसंचालकांकडे स्पष्टीकरण मागितले. मात्र उपसंचालकाने या आदेशाकडे दुर्लक्ष केले. धारावीतील मॉर्निंग स्टार इंग्लिश स्कूल या खासगी शाळेला शासनाची मान्यता अद्याप मिळालेली नाही. तरीही शिक्षण उपसंचालकांनी (मुंबई विभाग) नोव्हेंबर २०२३ मध्ये शाळेला इरादापत्र दिले. त्यामुळे त्यांची चौकशी करण्याची मागणी विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांनी महापालिका तसेच राज्याच्या शिक्षण विभागाकडे केली होती.
या तक्रारीनंतर महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांना पत्र पाठवून शाळेची (School) मान्यता रद्द करण्याची विनंती केली. दरम्यानच्या काळात या शाळेला इरादापत्राद्वारे मान्यता दिली गेली. यासंदर्भात २०२३ मध्ये धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ४ डिसेंबर २०२४ रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक (मुंबई) यांना पत्र पाठवले. त्यात ‘ शाळा अनधिकृत आहे, हे माहीत असतानाही ५ नोव्हेंबर २०२३ रोजी शाळेला (School) इरादा पत्र देण्याआधी ही वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनात का आणली नाही,’ अशी विचारणा करण्यात आली होती. तसेच या प्रकारासंदर्भात शासनास कागदपत्रांसह स्पष्टीकरण देण्याचे निर्देशही या पत्रात देण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community