अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारण्यासाठी स्थापना झालेल्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या नावाने एक दिल्लीतील एका तरुणाने चक्क बनावट वेबसाईट तयार केली. त्या तरुणाला सायबर क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केली. अविनाश बहुखंडी असे या तरुणाचे नाव आहे.
आरोपी दिल्लीतील राहणारा
या प्रकरणी २०२० मध्ये ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अटक केलेला तरुण दिल्लीतील सी-२० इंद्रपार्क नजफगड येथील रहिवाशी आहे. ज्याचा तपास या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. वेबसाईटच्या तपासणीत अविनाशचा ई-मेल, फोन आणि खाते क्रमांक उघडकीस आला. तो पूर्वी दिल्लीतील उत्तमनगर येथे राहत होता. टीम तिथे पोहोचल्यावर अविनाश घर विकून निघून गेल्याचे समजले. यानंतर दिल्लीतील नजफगडमध्ये तो असल्याचे आढळून आले. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलीस पथकाने आरोपीला अटक केली. ट्रस्टच्या बनावट साईटच्या मदतीने आरोपींची फसवणूक करणाऱ्यांची नेमकी संख्या किती आहे, याचा अंदाज पोलिसांना लावता आलेला नाही. तपासादरम्यान आरोपींच्या चौकशीत याबाबत स्पष्टता होणार आहे.
(हेही वाचा गिरणी कामगारांकरता अडीच हजार घरांसाठी सोडत)
Join Our WhatsApp Community