काँग्रेस (Congress) पक्षाचा एकमेव हिंदूत्ववादी चेहरा आणि प्रियंका गांधी वाड्रा यांचे राजकीय सल्लागार आचार्य प्रमोद कृष्णम भाजपात सामील होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. काँग्रेस (Congress) नेत्या सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी अयोध्येत भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा समारोहला जाण्यास नकार दिल्यापासून आचार्य कृष्णम पक्षावर नाराज आहेत. (Congress)
काँग्रेस (Congress) नेत्यांचा पक्षाला रामराम ठोकण्याचा क्रम थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. आता काँग्रेस (Congress) प्रवक्ते आचार्य प्रमोद कृष्णम काँग्रेस (Congress) सोडणार असल्याची चर्चा दिल्लीत जोरात आहे. कृष्णम यांनी कल्की धामच्या शिलान्याससाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना निमंत्रण दिले आहे. यामुळे ते काँग्रेस (Congress) सोडणार असल्याच्या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. मोदी देशासोबत आहेत आणि ज्याच्या सोबत देश आहे त्यांच्यासोबत मी आहे, अशी प्रतिक्रिया कृष्णम यांनी मोदी (PM Narendra Modi) यांना निमंत्रण दिल्यानंतर पत्रकारांना सांगितलं. (Congress)
(हेही वाचा – Aus vs WI ODI Series : विंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून विजय)
“तुफान भी आयेगा”
हा कार्यक्रम १९ फेब्रुवारीला होणार असून पंतप्रधान (PM Narendra Modi) या दिवशी मोठी घोषणा करू शकतात. काँग्रेसने (Congress) राज्यसभेवर पाठवावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र भाजपाकडून त्यांना उच्च सभागृहात पाठविले जाऊ शकते. आचार्य कृष्णम यांनी काँग्रेसच्या (Congress) विविध पदावर काम केले आहे आणि स्टार प्रचारक अशी त्यांची ओळख आहे. संभल आणि लखनौमधून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली आहे. मात्र त्यांचा पराभव झाला. लखनौची निवडणूक त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या विरोधात लढविली होती. कृष्णम यांनी ट्विट केले असून “तुफान भी आयेगा” असे लिहून संदेश दिला आहे. मात्र हे वादळ विध्वस करणारे नाही तर सृजनशील असेल. मोदी शांती आणि सनातन धर्माचे ध्वज वाहक म्हणून पुढे आले आहेत. आता शाश्वत सनातन धर्माचे वादळ येईल, असे त्यांनी म्हटले आहे. (Congress)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community