- प्रतिनिधी
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे. या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे. सेवा शुल्काच्या नावाखाली रक्कम कपात करणाऱ्या अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी मंगळवारी (१ ऑक्टोबर) येथे दिली.
आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी मंगळवारी मंत्रालयात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’चा राज्यस्तरीय आढावा बैठक घेतला. या बैठकीत बोलताना तटकरे यांनी, काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सिडींग नसल्याने लाभ मिळत नाही. याबाबत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदतीने २ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी. बँकेशी संबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात, अशा सूचना बैठकीत उपस्थित जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांना दिल्या.
(हेही वाचा – Ncp Dispute Case : राष्ट्रवादी कुणाची; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत काय घडलं?)
नांदेड जिल्ह्यात प्रत्यक्षात अर्ज भरताना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आणि पुरुषांचे आधार क्रमांक, खाते क्रमांक दिले गेल्याने पुरुषांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून ज्या केंद्रांवर हे अर्ज भरलेगेले त्या केंद्र चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश तटकरे (Aditi Tatkare) यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत २ कोटी ४० लाख महिलांची नोंदणी झाली असून १ कोटी ८७ लाख पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. उर्वरित अर्जांची पडताळणी तातडीने करून घ्यावी, अशा सूचनाही आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी बैठकीत दिल्या. या बैठकीला महिला आणि बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे, सर्व जिल्ह्यातील महिला आणि बालविकास अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community