केतकी चितळेवर राजकीय सूडातून कारवाई – महिला आयोग

155

अभिनेत्री केतकी चितळे हिला झालेली अटक राष्ट्रवादी काँग्रेसने सूड भावनेतून करण्यात आलेली कारवाई असल्याची टीका राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी केली आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना केतकी चितळेच्या अटकेबाबत समन्स पाठवले होते. यावर आयोगाला रिपोर्ट प्राप्त झाला असून त्यावर आक्षेप नोंदवत आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

कोर्टाच्या परवानगीशिवाय केतकीला अटक

यासंदर्भात रेखा शर्मा म्हणाल्या की, समन्सनंतर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी आम्हाला कारवाईचा रिपोर्ट पाठवला आहे. पण या रिपोर्टमध्ये अनेक विसंगती असून अदखलपात्र गुन्हा असतानाही केतकीला कोर्टाच्या योग्य परवानगीशिवाय अटक करण्यात आल्याचे दिसून येते. केतकीला मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. याप्रकरणात शरद पवारांनी स्वतः कोणताही अब्रुनुकसानीचा दावा केलेला नाही तर पक्षाकडून असा दावा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – राज ठाकरेंना इस्लामपूर न्यायालयाकडून दिलासा! काय आहे प्रकरण?)

त्यामुळे ज्या व्यक्तीवर टीका करण्यात आली आहे त्याच व्यक्तीने तक्रार दिली नसेल तर तो गुन्हा अदखलपात्र असतो, त्यामुळे इतर कोणत्या कारणांमुळे पोलिसांनी केतकीला अटक केली? असा सवालही यावेळी रेखा शर्मा यांनी विचारला आहे. सध्या केतकीची केस ही कोर्टात सुरु आहे. पण हा पूर्णपणे राजकीय सूडभावनेने केलेली कृती असल्याचे शर्मा यांनी म्हंटले आहे.

काय आहे प्रकऱण

केतकी चितळेने 15 मे रोजी फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेसेचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पवार समर्थकांनी मोठा वाद निर्माण केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली होती. नंतर कोर्टाने तिला कोठडीही सुनावली होती. तेव्हापासून केतकी अटकेत असून तिला अद्याप जामिन मिळालेला नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.