Hate Speech : नुपूर शर्मांवर कारवाई आणि उदयनिधी, टी राजांना अभय; का होतोय भेदभाव?

181

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांचा मुलगा उदयनिधी याने सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया, कोरोना म्हटले. तर डीएमकेचे नेते टी राजा यांनी हिंदू धर्माला कुष्ठरोग, एचआयव्ही असे संबोधित केले. या प्रकरणी उदयनीधी आणि टी राजा यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, पण इस्लाम धर्माचे प्रेषित महंमद पैगंबर यांच्यावर टिपण्णी केल्यामुळे भाजपच्या नुपूर शर्मा यांना पक्षातून काढून टाकण्यात आले, त्यांच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. हा भेदभाव का करण्यात येतो, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

2022 मध्ये नुपूर शर्मांनी एका टीव्ही डिबेटमध्ये मोहम्मद पैगंबर विषयी काही उद्गार काढले आणि ताबडतोब देशातच काय पण परदेशातही नुपूर शर्मांविरुद्ध केवळ असंतोषच नाही, तर संताप उफाळून आला. त्यातून त्यांच्या विरोधात सर तन से जुदाची घोषणा दिली गेली. नुपूर शर्मांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. देशभरात धर्मांध मुसलमानांनी मोठ – मोठ्या रॅली काढून धार्मिक दहशत निर्माण केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्लामिक देशांचा दबाव भारतावर वाढला. इतकेच नाही, तर नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे राजस्थानात कन्हैयालाल आणि महाराष्ट्रात उमेश कोल्हे या दोघांचे गळे चिरून हत्या करण्यात आल्या. एकीकडे नुपूर शर्मा आजही सर तन से जुदा या धमकीच्या सावटाखाली वावरते आहे. सार्वजनिक समारंभांमध्ये सहभागी होऊ शकत नाही. जिथे जाईल तिथे जीवे मारण्याची भीती आहे. इतके सगळे घडल्यानंतर आजही नुपूर शर्माला कुठूनच कुठल्याच इको सिस्टीमचे बँकिंग नाही.

हेही पहा –

पण नुपूर शर्माच्या पार्श्वभूमीवर उदयनिधी स्टालिनला मात्र तशाच स्वरूपाचे हेट स्पीच देऊनही ताबडतोब इको सिस्टीमचे बॅकिंग मिळाले आहे. सनातन धर्म कसा भेदभावी आहे, जातीपातींमध्ये विखुरल्याने कसा उच्चनीच भाव तिथे आजही मूळ धरून आहे, यासाठी इको सिस्टीम मधल्या शेकडो विचारवंतांनी उदयनिती स्टॅलिन भोवती “वैचारिक सुरक्षा कवच” उभारले. उदयनिधीने उघडपणे सनातन धर्माला डेंगी, मलेरिया, कोरोना, संबोधले. त्यांच्या समर्थनासाठी तुझी घोटाळ्यातला मुख्य आरोपी ए. राजा समोर येऊन सनातन धर्माला एचआयव्ही आणि कुष्ठरोग ठरवून मोकळे झाले. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी देखील उदयनिधींचे समर्थन केले. उदयनिधी ट्रोल व्हायला लागतातच त्यांच्याभोवतीचा बंदोबस्त वाढवला. पण उदयनिधी निधीच्या वक्तव्याविरोधात एक दोन ठिकाणी झालेली निदर्शने वगळता बाकी कुठेही त्याचे साधे पडसादही उमटले नाहीत. किंबहुना आजही उदयनिधी आपल्या सनातन धर्माच्या टीकेवर ठाम असताना त्यांच्याविरुद्ध कुठलीही सर तन से जुदाची धमकी कोणी दिलेली नाही. अयोध्येतील एका महंतांनी त्यांची जीभ कापण्याची धमकी दिली, मात्र त्यांच्याविरुद्ध ताबडतोब गुन्हा दाखल झाला. नुपूर शर्माच्या टीव्ही डिबेट मधल्या एका वक्तव्यावर एका वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत त्याविषयी कायदेशीर कारवाई सुरू केली. पण उदयनिधी यांनी सनातन धर्माविषयी बेलगाम उद्गार काढल्यानंतर त्यांच्यावर अद्याप हेट स्पीच विषयी सर्वोच्च न्यायालयाने कोणती कारवाई सुरू केली नाही. नुपूर शर्मा आणि उदयनिधी यांची वक्तव्ये पब्लिक डोमेन मध्ये आहेत. ती हेट स्पीच या निकषात बसतात की नाही हे समान पातळीवर बघण्याची गरज असताना प्रत्यक्षात नुपूर शर्माच्या बाबतीत सर तन से जुदा घोषणा अंमलात आणण्याचाही प्रयत्न झाला, पण त्याचवेळी उदयनिधी बाबत मात्र बौद्धिक सुरक्षा कवच उभारून इको सिस्टीम सनातन धर्माला अधिकाधिक बदनाम करू पाहत आहे, ही भारतातली आजची वस्तुस्थिती आहे.

(हेही वाचा G20 शिखर परिषदेत येणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना मिळणार प्रत्येकी १ हजार रुपये; कारण…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.