मढमधील अनधिकृत स्टुडिओंवर हातोडा! किरीट सोमय्यांचा आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्यावर हल्लाबोल

125

अस्लम शेख यांनी मढ मार्वेमध्ये अनधिकृत स्टुडिओ बांधण्यासाठी परवानगी दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर मढ-मार्वेतील अनधिकृत स्टुडिओंवर कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. कोविडच्या काळात स्थानिक आमदार अस्लम शेख आणि मुंबईचे तत्कालीन पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कृपेने मढ येथे समुद्र किनारी अनधिकृत स्टुडिओ उभारण्यात आला आहे असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

( हेही वाचा : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळण्यासाठी देशभरात 800 ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त गदापूजन! )

महापालिकेच्यावतीने कारवाई सुरू 

याच पार्श्वभूमीवर हे स्टुडिओ पाडण्याचे काम सकाळपासूनच सुरु झाले आहे. महापालिकेच्यावतीने ही कारवाई करण्यात येते असून, ठाकरे सरकारच्या कृपेने डझनभर अनधिकृत स्टुडिओ मालाडमध्ये उभे राहिले आहेत, या सर्व स्टुडिओला परवानगी आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयाने दिली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई पालिकेने आओ जाओ घर तुम्हारा, मातोश्रीवर हिशोब द्या असा प्रकार सुरू होता असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. पण आता हे स्टुडिओ पाडण्याचे काम सुरू झाले आहे ‘मोदी है तो मुमकीन है’ असेही सोमय्या म्हणाले.

आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख या दोघांनी मिळून स्टुडिओला परवानगी दिली होती. या सर्व गोष्टींमागे अस्लम शेख म्हणजेच काँग्रेसचा हात आणि वांद्र्याची नोट मोजण्याची मशीन यांची आघाडी होती, असा हल्लाबोल किरीट सोमय्यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.