पवई येथील भीमनगर परिसरातील झोपडपट्टीवर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईची चौकशी करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शनिवारी दिले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १ जून ते ३० सप्टेंबरच्या काळात निष्कासनाची कारवाई करता येत नाही. न्यायालयाच्या आदशाचे उल्लंघन झाले असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. मुंबई महानगरपालिकेने बेघरांसाठी शेल्टर बांधले आहेत. संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांनी या लोकांची तेथे राहण्याची सोय करावी, असहा सूचना नार्वेकर यांनी केल्या. मात्र, अध्यक्षांच्या या निर्देशाने समाधान न झाल्याने विरोधी पक्षाने सरकारचा निषेध करत सभात्याग केला. (Rahul Narvekar)
(हेही वाचा – विधानभवनातील अभ्यागतांच्या प्रवेशावर मर्यादा; Rahul Narvekar यांची घोषणा)
पवई येथील भीमनगर परिसरातील झोपड्यांवरील कारवाईबाबतचा प्रश्न काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. याठिकाणी ६५० गरीब, मागासवर्गीय कुटुंबावर ६ जूनच्या रात्री पोलीस बंदोबस्तात कारवाई करून या कुटुंबांना बेघर करण्यात आले. आज ही सर्व कुटुंबं रस्त्यावर आहेत. पोलीस आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून चुकीची कारवाई करून या मागासवर्गीय लोकांना बेघर करण्यात आल्याचा आरोप पटोले यांनी केला. तर पोलीस ताफा वापरून मागासवर्गीय अन्याय केला गेला. गर्भवती स्त्रियांना मारले, १४ वर्षाच्या मुलाला मारले. स्वत:ला बुलडोझर बाबा म्हणता आणि गरीबावर बुलडोजर चालवता ही हुकुमशाही असून याप्रकरणी अट्रोसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. याप्रकरणी कारवाईसाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी त्याची दखल घेत सरकारला वरील निर्देश दिले. (Rahul Narvekar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community