राष्ट्रवादीचा ‘हा’ तिसरा मंत्री ईडीच्या निशाण्यावर! 13 कोटींची मालमत्ता जप्त

131

राज्य सरकारमधील 12 हून अधिक मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गेल्या आठवड्यात नवाब मलिकांना अटक करण्यात आली असून अनिल देशमुख काही महिन्यापासून अटकेत आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचा तिसरा मंत्री ईडीच्या निशाण्यावर असल्याचं समोर आले आहे.

तनपुरे यांच्यावर ईडीने केली कारवाई

राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने कारवाई केली असून राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास 13 कोटी 41 लाख इतकी असल्याची माहिती समोर येत आहे. ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या दोन जमिनीही जप्त केल्या आहेत. त्या जागांची किंमत जवळपास 7 कोटी 60 लाख इतकी आहे.

(हेह वाचा – ‘आता खेळ सुरू झाला आहे!’ राऊतांनी पंतप्रधानांना पत्र पाठवत केला ‘गौप्यस्फोट’)

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई करत मालमत्ता जप्त

प्राजक्त तनपुरे यांच्या कारखान्यावरील मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा फटका काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनाही बसला आहे. राम गणेश गडकरी साखर कारखान्याची नागपूरमधली 90 एकर जमीन काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या तक्षशिला सिक्युरिटीजने खरेदी केली असून अहमदनगरमधील 4 एकर जमीनीचा समावेश आहे. ईडीने ही संपत्तीसुद्धा जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक यांच्या लिलावात एक साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप आहे. ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याबाबत चौकशी सुरू केली होती. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्ये तनपुरे यांचा जबाब नोंदवण्यात आला. हा तपास सुरू असताना आता ईडीने तनपुरे यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई करत मालमत्ता जप्त केली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.