केतकी चितळेवर कारवाई, मग शेख हुसेन यांच्यावर का नाही? भाजपचा सवाल

169

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागपूरमधील काँग्रेस नेता शेख हुसेन यांनी धमकी दिल्याचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. याप्रकरणी भाजप आक्रमक होत त्यांनी शेख हुसेन यांना अटक करा, अशी मागणी कऱण्यात येत आहे. तर मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर कारवाई केली जात तर शेख हुसैन यांच्यावर का नाही, असा आक्रमक सवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

…तर न्यायालयात जाणार

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पोलिसांना तीन दिवस वेळ देऊ, शेख हुसेन यांनी अटक झाली नाही तर न्यायालयात जाणार. तसेच नारायण राणी यांनी मुख्यमंत्र्याबाबत थप्पड हा शब्द उच्चारला तेव्हा त्यांना अटक केली. मग शेख हुसेन यांनी पंतप्रधानांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अटकेची कारवाई का नाही, नागपूर पोलीस कोणाच्या दबावात आहे का, असा सवाल भाजप नेत्यांचा नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केला आहे.

(हेही वाचा – विधान परिषदेसाठी मलिक, देशमुखांना मतदान करता येणार नाही)

हुसेन यांच्याशिवाय ‘त्या’ कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करा’, ‘मंत्री नितीन राऊत, मंत्री विजय वडेट्टीवार, आ. विकास ठाकरे, आ. अभिजीत वंजारी, राजेंद्र मुळक यांनी पंतप्रधान यांच्याबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा’ याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांचे नागपूर पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.

नागपूर भाजपने दाखल केली तक्रार 

मंगळवारी रात्री हुसेन यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ (अश्लील कृत्ये आणि गाणी) आणि ५०४ आयपीसी (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. सध्या काँग्रेस राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरून आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर काढलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेख हुसेन यांनी पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह शब्दांत एक विधान केले होते. या केलेल्या विधानामुळे नागपूर भाजपने तक्रार दाखल केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.