राज्यात बोगस खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा कृषीमंत्र्यांनी विधानपरिषद सभागृहात केली. विश्व खत उत्पादक संघटनेने नांदेड येथील श्री महाराष्ट्र फर्टीलायझर्स अँड केमिकल या महाउद्योग ब्रँड कंपनीने बोगस खत उत्पादक करणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी कृषी आयुक्तांकडे केली होती. यावर कृषीमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पुरावे दिल्यास त्यावर कारवाई करण्याची तयारी दर्शवली.
( हेही वाचा : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून )
बोगस खताची किंमत १२ हजार प्रति टन तर सरकारच्या खताची किंमत २२ हजार ५०० रुपये इतकी आहे. याबाबत तफावत का? खताचे दर १२ हजार करण्यासाठी सरकार काय भूमिका घेणार असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. यावर नांदेडच्या बोगस खत उत्पादक कंपनीला नोटीस दिली असून चौकशी सुरू असल्याचे कृषीमंत्री यांनी उत्तर दिले.
पीकविम्याचे पैसे देणार
दरम्यान अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे ३१ मेपर्यंत देणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. नुकसान झालेला एकही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत असे सत्तार यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community