- प्रतिनिधी
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असून कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी व्यक्त केली आहे. जर कोणाचा या प्रकरणाशी संबंधच नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलेली कागदपत्रे त्यांना सुपूर्द केली. या प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचेही पवार यांनी सांगितले.
(हेही वाचा – Delhi Assembly Election : राजकीय पक्षांच्या भरघोष घोषणांमुळे मतदारांचा गोंधळ)
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया आणि आमदार सुरेश धस यांनी याप्रश्नी सातत्याने आवाज उठवला आहे. दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांना भेटून या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे दिली होती, जी पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही कागदपत्रे एसआयटी आणि सीआयडीकडे पाठविल्याची माहिती आहे.
धस यांच्या आरोपांवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) म्हणाले, “सुरेश धस यांना काय वाटते, याच्याशी मला काही देणेघेणे नाही. महायुती सरकार योग्य प्रकारे काम करावे यासाठी आम्ही वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय घेत असतो. विविध पक्षांच्या नेत्यांनी अनावश्यक वक्तव्ये करणे टाळावे, अन्यथा त्याला अंत उरणार नाही.” पवार यांच्या या विधानांमुळे मस्साजोग प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारची भूमिका आणखी ठोस झाल्याचे दिसते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community