मुंबईला रक्तबंबाळ करणारा आरोपी याकूब मेमन याच्या कबरीचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. याकूब मेमन याची कबर फुलांनी सजवण्यात आल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमेकांविरोधात टीकेची झोड उठली आहे. आता यावर मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. जे चुकीचे आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
याकूब मेमन प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते फडणवीसांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी या विषयावर जास्त बोलणे टाळले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जे काही चुकीचे आहे त्यांच्यावर कारवाई होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
( हेही वाचा: मराठा आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती थांबवा अन्यथा…, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा )
Join Our WhatsApp Community