Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ३० मार्च रोजी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात (Raj Thackeray Gudi Padwa Melawa 2025) मराठी भाषा आणि मराठी अस्मितेवर पुन्हा एकदा भाष्य केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही. ही बाब प्रत्येक सरकारी अस्थापनेत तपासून पाहा, असे आदेश राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिले. ज्यानंतर आता मनसैनिक कामाला लागले आहेत. ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांसह अविनाश जाधव यांनी बँकेवर धडक मारली. (Raj Thackeray)
(हेही वाचा – यशवंतराव चव्हाण ग्रंथ निर्मिती आणि अनुवाद मंडळ स्थापन करणार; मंत्री Uday Samant यांची घोषणा )
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलेल्या या आदेशाचे पालन मनसेसैनिक मंगळवारपासून करताना दिसत आहेत. ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी बँकेवर (Bank) धडक मारली तसेच यावेळी बँकेतील सर्व व्यवहार मराठी भाषेत असणे अनिवार्य करावे, अशी मागणी देखील यावेळी मनसैनिकांनी केली आहे. मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav), ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी बँकेला निवेदन दिले आहे. तसेच यावेळी इंग्रजी व हिंदी भाषेतील फलक देखील कार्यकर्त्यांनी उतरवले आहेत. यावेळी येथील बँकेत मराठी भाषा नसल्याचे निदर्शनास आले. आता हात जोडून येतो नंतर हात सोडून येणार, मराठी दिसली नाही तर मनसे स्टाईल दाखवणार, असा इशारा देखील यावेळी बँक मॅनेजरला देण्यात आला.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिक चांगलेच पेटून उठल्याचे दिसून येत आहे. मराठीत कारभार झाला नाही तर सर्व बॅनर्स बँकेत आम्ही स्वखर्चाने लावणार. मराठी व्यवहार झाला नाही तर फुकट मार खाल. मराठी माणसाचा तसेच मराठीचा अपमान होत असेल तर आमचे लाथ आणि हात दोन्ही गोष्टी पडतील, असा इशाराच मनसैनिकांनी दिला आहे.
वाहतूक शाखेला मराठी भाषेचा विसर
दरम्यान, पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर हुजूरपागा, नू. म. वि. शाळेजवळ वाहतुकीचे नियम कळावेत म्हणून अनेक ठिकाणी वाहतूक शाखेकडून फलक लावले आहेत. परंतु ही सर्व फलक इंग्रजी भाषेत असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे याचा वाहतूक शाखेला विसर पडला आहे. याच्या निषेधार्थ मनसेतर्फे निषेध करण्यात येणार असून इंग्रजी फलकावर मराठी फलक लावण्यात येणार आहे.
(हेही वाचा – veer savarkar garden borivali west : लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आनंद लुटू शकतात; बोरिवलीतील वीर सावरकर उद्यानाचे वेळापत्रक!)