एकेकाळी शिवसेना चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष असलेल्या शरद पोंक्षे यांनी यावेळी शिवसेनेलाच टोला लगावला आहे. निवडणुकांच्या काळात प्रचारासाठी दरवाज्यांवर ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’चे स्टिकर लावण्यात येतात. आताही निवडणुका तोंडावर आहेत, पण या आगामी निवडणुकांमध्ये कुठलाही पक्ष हा नारा देत प्रचार करेल असे मला वाटत नाही, असा अप्रत्यक्ष टोला पोंक्षे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेला लगावला आहे. त्यांच्या या विधानानंतर श्रोत्यांमध्ये हशा पिकला.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर येथे संस्कार भारती, कोकण प्रांततर्फे अभिनेते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांचे व्याख्यान शनिवारी आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
(हेही वाचाः “…नाहीतर सरकारला भाग पाडू”, फडणवीसांचा इशारा)
‘गर्व से कहो हम हिंदू है’, ऐकू येणार नाही
शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंच्या अस्तित्वासाठी कायमंच आवाज उठवला. गर्व से कहो हम हिंदू है, असा नारा बाळासाहेबांनी दिला होता. त्यावेळी अनेकदा शिवसेनेकडून निवडणुकांच्या प्रचारात सुद्धा हा नारा दिला जात असे. पण आगामी महापालिका निवडणुकीत हा नारा दिला जाईल, असे आपल्याला वाटत नाही. अशा शब्दांत शरद पोंक्षे यांनी टोला लगावला.
शिवसेनेने हिंदुत्व सोडले?
राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचा आरोप वारंवार विरोधी पक्ष भाजपकडून करण्यात येत आहे. आता एकेकाळी शिवसेनेत पदाधिकारी असलेल्या शरद पोंक्षे यांनी असे वक्तव्य केल्यामुळे आता यावरुन पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
(हेही वाचाः उद्घाटन सोहळ्यातही मोदी जपणार महाराष्ट्राची संस्कृती!)
Join Our WhatsApp Community