मुंबईच्या विलेपार्लेमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावे यांनी मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी आपले चित्रपट प्रेम आणि इतर प्रश्नांची उत्तरे दिली. या मुलाखती दरम्यान, सुबोध भावे यांनी नातवाला महाराजांची गोष्ट सांगायची झाल्यास, कोणती गोष्ट सांगाल? असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.
किआनला महाराजांची कोणती गोष्ट सांगणार?
किआनला गोष्ट सांगायची असल्यास, शिवाजी महाराजांची कोणती गोष्ट सांगणार? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला असता ते म्हणाले, मुलगा असल्याने आणि त्यात तो ठाकरे असल्याने त्याला लढाया सांगाव्या लागतील, असे मला वाटतं नाही. मोठा झाला की त्याला इतर गोष्टीही सांगेन. मला असे वाटते, शिवाजी महाराजांना जिजामातांनी रामायण आणि महाभारतातील कथा ऐकवल्या. ते जे संस्कार आहेत, तेच संस्कार पुढे सुरु ठेवायला हवे, असे मला वाटते.
( हेही वाचा: शरद पवारांना लोकशाही हवेय की घराणेशाही? )
स्वरराज ते राज ठाकरे
राज ठाकरे यांचे खरे नाव स्वरराज होते, मग ते आता राज कसे झाले? या प्रश्नावर उत्तर देताना, राज ठाकरे म्हणाले की, माझ्या वडिलांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी संगीतात काहीतरी करेन, अशी अपेक्षा त्यांना होती. त्यांनी माझ्याकडून अनेक वाद्ये वाजवून घेण्याचा प्रयत्न केला. मी स्वरराज नावाने व्यंगचित्र काढायचो. मात्र, एके दिवशी “मी बाळ ठाकरे” या नावाने व्यंगचित्र काढायला सुरुवात केली. तू राज ठाकरे या नावाने सुरुवात करायची, असे मला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले. त्यानंतर काॅलेजमध्ये असताना, माझे दुसरे बारसे राज या नावाने झाले, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community