घ्या… आता ‘या’ अभिनेत्रीची फडणवीसांवर आक्षेपार्ह भाषेत टीका

135

अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघालं आहे. त्यानंतर आता शिवसेना नेत्या अभिनेत्री दिपाली सय्यद हिने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. एक ट्वीट करत त्यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.

(हेही वाचाः RBI ने पाकिस्तानसाठी काम केले, कधी आणि का?)

दिपाली सय्यद यांचं ट्वीट

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरेंवर टीका करणारं एक ट्वीट केलं होतं. त्याला उत्तर म्हणून सय्यद यांनी हे ट्वीट केलं आहे.

Screenshot 2022 05 16 204821

(हेही वाचाः सोसायटींमधील वादांच्या तक्रारींसाठी आता स्वतंत्र पोलिस अधिकारी, पोलिस आयुक्तांची घोषणा)

अमृता फडणवीस यांचं ट्वीट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या आपल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांच्या वजनावरुन वक्तव्य केलं होतं. त्याला फडणवीसांनी भर सभेतून उत्तर दिलं. त्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट करत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली. वज़नदार ने हल्के को,

बस हल्के से ही वज़न से,

कल ‘हल्का’ कर दिया …

असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

(हेही वाचाः मिसेस फडणवीसांचा ‘वजनदार’ शब्दांत मुख्यमंत्र्यावर निशाणा! म्हणाल्या…)

माझं राजकीय वजन कमी करू शकाल पण…

देवेंद्र फडणवीस यांनी नुसता पाय ठेवला असता तरी त्यांच्या वजनाने बाबरी ढाचा खाली आला असता, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, त्यांचा माझ्यावर किती विश्वास आहे तो बघा. आज माझं वजन 102 किलो आहे, ज्यावेळी मी बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं. माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी करू शकाल. पण लक्षात ठेवा हा देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.

(हेही वाचाः तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा खाली आणणार, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.