अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली CM Devendra Fadnavis यांची भेट

166
अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली CM Devendra Fadnavis यांची भेट
अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली CM Devendra Fadnavis यांची भेट

बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या दरम्यान भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिचे नाव घेत केलेल्या वक्तव्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच यानंतर प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन तक्रारीचे निवेदन सादर केले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयामार्फत ही माहिती देण्यात आली. एक्स खात्यावरून फोटो पोस्ट करून म्हटलंय की, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी त्यांना आश्वस्त केले. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले.

पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळी काय म्हणाली ?
“कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांत जाणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे. परळीच नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी काम केलं आहे. यापुढेही काम करत राहणार. याआधीही अनेक राजकीय नेत्यांबरोबर, मान्यवरांबरोबर फोटो आहेत. मग त्या फोटोचा संदर्भ घेऊन तुम्ही कुणाहीबरोबर असंच नाव जोडणार का? हे एक महिला कलाकार म्हणून मला अतिशय निंदनीय वाटतं. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही.” असं प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत म्हणाली. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.