लाडकी बहीण योजनेच्या ( Ladki Bahin Yojana) अंतर्गत अर्जाची फेरतपासणी सुरू असून, निकष पूर्ण न करणाऱ्या तसेच बनावट कागदपत्रे (Fake documents) लाभार्थ्यांवर कारवाई होत आहे.बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या काही लाडक्या बहिणींवर पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे.
( हेही वाचा : काँग्रेसची ‘EAGLE’ समिती स्थापन; निवडणुकीतील पारदर्शकतेवर नजर)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ( Ladki Bahin Yojana) बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले.तसेच सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. महिला व बालविकास विभाग (Women and Child Development Department) अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे, असे आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
जानेवारी 2025 पर्यंत या योजनेच्या सात हप्त्यांचे प्रत्येकी दिड हजार रुपये प्रमाणे 10 दहा हजार 500 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. मात्र, पात्रतेची तपासणी सुरू असल्याने कारवाईच्या भीतीने अनेक महिला योजनेचा लाभ नाकारत अर्ज करताना दिसत आहेत. जानेवारी महिन्याचा हफ्ता काही दिवसांपूर्वी सर्व महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. तर निकषात न बसणाऱ्या महिलांवर (Women) कारवाई होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये भीतीचे वातावरण आहे, काही महिलां स्वतःहून मिळालेला लाभ नाकारत आहेत. (Aditi Tatkare)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community