मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. दरम्यान, माझी लाडकी बहीण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार आहेत? तसेच सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात १५०० रुपये कधीपर्यंत जमा होतील? यासंदर्भातील महत्वाची माहिती आज (१६ सप्टेंबर) महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अजून विस्तारत जाणार आहे का? असा प्रश्न विचारला असता मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी ४० लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच ३१ ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल ५२ लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला.”
(हेही वाचा-Kolkata Crime: कोलकाता रुग्णालयात आजारी मुलाच्या आईचा विनयभंग! वॉर्डबॉयला अटक)
“सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे.ज्या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ ऑगस्ट महिन्यात मिळाला आहे, त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा देखील आम्ही लाभ लवकरच वितरीत करणार आहोत. ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेले आहेत. त्यांना देखील लाभाची सुरुवात या महिन्यात होईल. तसेच सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे, तो लाभ पात्र महिलांना लवकरच वितरीत करण्यात येईल.” अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. (Ladki Bahin Yojana)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community