लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष विधानसभा निवडणुकीकडे (Vidhan Sabha Election 2024) लागले आहे. अशातच राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री (Gondia District Guardian Minister) म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या एका महिला नेत्यावर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. धर्माराव बाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती समोर आली आहे. (Aditi Tatkare)
गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) हे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आहेत. मात्र त्यांनी प्रकृतीचे कारण देत गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, गोंदियाचे पालकमंत्रीपद सोडण्याबाबतच्या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांना दिली.
(हेही वाचा – पाकड्यांसमोर छातीठोकपणे उभे राहणारे ग्रुप कॅप्टन Abhinandana vardhamana)
प्रकृतीचे कारण की आणखी काही?
लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून (Gadchiroli-Chimur Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी धर्मरावबाबा आत्राम हे इच्छुक होते. यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुद्धा केली होती. पण उमेदवारी न मिळाल्याने ते काहीसे नाराज होते. तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षापासून त्यांचा दुरावा वाढल्याची चर्चा होती. अशातच त्यांनी आता गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यांच्या निर्णयामागे नेमके प्रकृतीचे कारण आहे की आणखी काही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Aditi Tatkare)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community