याआधी २०१९ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला आले होते, तेव्हा त्यांनी ‘पहिले मंदिर फिर सरकार’, अशी घोषणा केली होती आणि योगायोगाने न्यायालयाचा निर्णय आला आता मंदिर उभे राहत आहे. आमची ही अयोध्या यात्रा तीर्थयात्रा आहे, राजकारणासाठी आम्ही इथे आलो नाही, असे सांगत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यात यावे, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे, त्यासाठी ते उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी यांना पत्र लिहिणार आहेत, त्यामध्ये किमान १०० प्रशस्त खोल्या असतील, अशी माहिती दिली.
आम्हाला विरोध नाही
अयोध्या ही पवित्र भूमी आहे, आमच्या आस्थेचा विषय आहे. आमच्या हातून लोकांची सेवा व्हावी, यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही अयोध्येला आलो आहोत. आमचे हिंदुत्व स्पष्ट आहे. आम्ही निवडणुकीत जी आश्वासने देतो ती पूर्ण करणे हेच आमचे हिंदुत्व आहे, असे सांगत आम्हाला हनुमान गढीतील संत-महंतांचा विरोध नाही. इथे आमचे स्वागत झाले आहे, कोरोना काळात परराज्यातील जनतेला आपण स्थानिकांप्रमाणे प्राधान्य दिले होते, त्यामुळे आमचे इथे स्वागत झाले आहे. याठिकाणी शिवसेनेची शाखा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा विषय मांडला होता, त्याचे मतांत किती रूपांतर होते, हे आमच्यासाठी महत्वाचे नाही. या ठिकाणी शक्तिप्रदर्शन केले का, यावर बोलताना शक्ती आणि भक्ती एकच आहे, असेही ते म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्याला विरोध झाला, त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी कोण कुणाचे स्वागत करतो आणि विरोध करतो हा वेगळा मुद्दा आहे, आपण अन्य पक्षांविषयी बोलणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community