मुंबई महापालिकेने शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरें विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे बेकायदेशीररित्या उद्घाटन केल्याप्रकरणी ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Lower Parel)
महापालिकेच्या नियोजित उद्घाटनापूर्वीच आदित्य ठाकरेंनी या पुलाचं उद्घाटन करून त्यावरून वाहतूक सुरू केली आहे. अशा प्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर असल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.या विरोधात आता मुंबई महापालिका अॅक्शन मोड मध्ये आलेली पाहायला मिळत आहे .
एन एम जोशी पोलीस स्टेशन येथे मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. गुरूवारी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीररित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून डीलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले होते. शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) मध्यरात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Lower Parel)
(हेही वाचा :Lower Parel : लोअर परळ डिलाईल पुलाची दुसरी मार्गिका येत्या चार दिवसांमध्ये होणार सुरु)
डिलाई रोडवर इतर कामे अपूर्ण असताना आणि साधारणपणे सात दिवसानंतर या ब्रिजचं काम पूर्ण करून लेन सुरू करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केलेले होतं. असं असताना अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर असल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. महापालिकेच्या नियोजित उद्घाटनापूर्वीच आदित्य ठाकरेंनी या पुलाचं उद्घाटन करून त्यावरून वाहतूक सुरू केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community