पोपट कोणाचा मेला याची जर चाचणी घ्यायची असेल तर आदित्य ठाकरेंनी वरळीतला राजीनामा द्यावा असे आव्हान भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंना केले होते. आता यावर प्रतिक्रिया देते आदित्य ठाकरेंनी भाजप मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रतिआव्हान दिले आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
मुंबई फुटबॉल असोसिएशन, फुटबॉल ऑस्ट्रेलिया आणि मुंबईतील ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासद्वारे शनिवार, २० जूनपासून पुढील दोन दिवस फुटबॉल डेव्हलपमेंट वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. या फुटबॉल वर्कशॉपच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांसोबत बोलताना मुनगंटीवाराच्या आव्हानावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ते जर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माझ्या समोर उभे करत असतील तर आता राजीनामा देतो. तयारी आहे. पण मुळात काय आहे, त्यांचं (सुधीर मुनगंटीवार) पण कुणी या सरकारमध्ये ऐकत नाही, अशी परिस्थिती झाली आहे.
(हेही वाचा – Raj Thackeray : “मराठी मुसलमान जिथं राहतात तिथं दंगली होत नाहीत” – राज ठाकरे)
सुधीर मुनगंटीवार नेमके काय म्हणाले होते?
‘पोपट मेला आहे. २०२४ मध्ये निवडणुका होणारच आहे. तुमचे शिल्लक आमदार आहेत त्यांना राजीनामा द्यायाला सांगा. तिथे टेस्ट घ्या. वरळी विधानसभेचा राजीनामा द्या. वरळीत टेस्ट करू. तुम्हाला आनंद होतोय ना…पोपट मेला की जिवंत ते वरळीत चेक करू,’ असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community