‘होऊ द्या प्रचार’ म्हणत आदित्य ठाकरेंचे भाजपला आव्हान!

121

प्रत्येक राज्यात लोकसभा ते ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पणजी येथे बोलताना केली आहे. भाजपची कोंडी करण्यासाठी शिवसेनेने केलेली ही खेळी सुरू असल्याची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा, लोकसभा, जिल्हापरिषद आणि ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणार आहोत. महाराष्ट्राच्या बाहेरही शिवसेनेची गरज जाणवत आहे. भाजपला माहित आहे की आमचे डिपॉझिट जप्त होणार आहे, आमचा पक्ष इतकाच कमकुवत वाटत असेल, तर आमच्यावर टीका का करत आहात? असाही प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. आमच्यावर बोलता तरी का? कसली भीती वाटते आहे? होऊद्या प्रचार अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपला आव्हान दिले.

गोव्यात प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा उघडणार

गेल्या ५ वर्षांमध्ये पाठीत खंजीर खुपसला, आमच्यासोबतच एनडीएच्या पक्षांच्या पाठीतही हा खंजीर खुपसण्यात आला. त्यामुळे एनडीएतून पक्ष बाहेर पडत गेले. पण आता आमचे ज्याठिकाणी अस्तित्व होते, त्याठिकाणी आम्ही निवडणूका लढत आहोत. उत्तर प्रदेशात निवडणूक लढतगोव्यात प्रत्येक गावात आम्ही शिवसेनेची शाखा उघडणार  आहोत, बिहारमध्ये लढतो आहोत, सिल्वासा येथे लढलो आहोत, मणीपूरमध्ये निवडणुकीला सामोरे जात आहोत. लोकसभा तसेच विधानसभेची निवडणूकही आम्ही लढतो आहोत. आज गोव्यात लढत आहोत. जो काही आमचा कनेक्ट होता तो आहेच. तो फॉर्मली जनतेशी तो कनेक्ट करण्यासाठी आम्ही लढत आहोत. असल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – #Hijabban: हिजाबबाबत कुराणात काय म्हटलंय? वाचा ‘या’ राज्यपालांचं मत)

स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष म्हणजे शिवसेना

शिवसेनेबाबत जस वातावरण बनत चालल आहे, रिपोर्ट महत्वाचे आहेत. आता निवडणूकीच्या कारणाने शिवसेनेचे चिन्ह घरोघरी पोहचत आहे. महाराष्ट्राच्या बाहेरही शिवसेनेची गरज जाणवत आहे. महाराष्ट्राचं मॉडल तिथे नेणार आहोत. उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये आहे. हेच गुड गव्हर्नन्स मॉडल सर्वच राज्यात नेणार आहोत. शिवसेना म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. शिवसेना गोव्याला नवीन नाही, असा दावाही त्यांनी केला.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.