Aditya Thackeray : डर अच्छा है! – आदित्य ठाकरे

232
Aditya Thackeray : डर अच्छा है! - आदित्य ठाकरे
Aditya Thackeray : डर अच्छा है! - आदित्य ठाकरे

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री यांचा परदेश दौरा करणार होते. जर्मनीला जाणार होते का तर रस्ते बघायला, कित्येक वर्षे खातं तुमच्याकडे होतं मग तुम्ही जे रस्ते तयार केलेत ते चुकीचे होते का? लंडनला का जाणार होते. आम्ही प्रश्न विचारल्यानंतर ३० मिनिटात मंत्रालयातून दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आमच्या ट्विटनंतर दौरा रद्द करावा लागला, जनतेचा पैसा आम्ही वाचवला. डर अच्छा है! असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घाना येथे दौऱ्या संदर्भात देखील आदित्य ठाकरे यांनी भाष्य करत घटनात्मक तेच प्रसंग असताना त्यावर निर्णय न घेता परदेश दौऱ्यावर जाण्यासंदर्भात देखील आसूड ओढले. यामुळेच की काय राहुल नार्वेकर यांचा घाना दौरा रद्द झाला आहे. राज्यात लोकशाही धाराशाही पडली आहे व स्पीकरसाहेबांच्या शेरवानीवर त्या रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत. लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांचे स्वागत घानात होणार आहे काय? लोकशाहीचा पवित्र आत्मा लोकशाहीच्या मंदिरात मारायचा व त्याच लोकशाहीची ‘घंटा’ बडवत घाना देशी लोकशाहीच्या आंतरराष्ट्रीय मंचावर मिरवायचे हे ढोंग आहे. (Aditya Thackeray)

वाघनखं भाडेतत्वावर आणणार की कायमसाठी…

वाघनखे परतावा आहेत की, भाडेतत्वावर घेऊन येणार आहेत. कारण जो जीआर निघाला आहे. ही वाघनखे जनमानसाच्या दर्शनाकरिता तीन वर्षासाठी कालावधीसाठी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने मान्य केले आहे. मग ही वाघनखे कर्जावर आहे की, परतावा आहे. जर परतावा असेल, तर महाराजांचे मंदिर बांधावे आणि त्यात ही वाघनखे ठेवली जावी. पण वाघनखे शिवकालीन आहे की, महाराजांनी वापरलेली आहेत. यासंदर्भात राज्य सरकारकडून स्पष्टीकरण यावे, आणि दुसरे म्हणजे हे कर्जावर घेतले की परतावा आहे. जर परतावा असेल, तर चांगले आहे सर्व मंत्रीमंडळांनी त्यांचे स्वागत करावे. आम्ही सर्वजण वाजत गाजत स्वागत करू. राज्यातील लोकांशी खोटे बोलणे योग्य नाही. यामुळे राज्य सरकारने या प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. (Aditya Thackeray)

ही माझी वैयक्तिक भूमिका नाही

जनतेचे पैसे उडवू नका!! जानेवारी मध्ये डाओस ला कॉन्फरन्स आहे. जपान दौऱ्याचा आणखी एक जी आर निघाला उपमुख्यमंत्री यांना टोकिओमध्ये बोलवलं होत. या दौऱ्याचा खर्च एमआयडीसीला उचलायचा आहे. मग उद्योगमंत्री का नव्हते गेले?

(हेही वाचा – NCP : राष्ट्रवादी काँग्रेसवर कुणाचा अधिकार?)

या दौऱ्यात नेमकं काय झालं?

उपसभापती महोदय या परदेशात गेल्या ५० लोकांना घेऊन गेल्या अभ्यास दौऱ्याला. काय अभ्यास केला? ग्राम सडक योजनेतून न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया जाऊन आले आता बघू रस्ते कसे होतात. वित्त विभागाने सांगावं हे योग्य आहे की अयोग्य?

शेतकऱ्यांना मदतीचा हात नाही मिळाला आणि येथे पैश्याची उधळपट्टी सुरू आहे. जीएसटीचा परतावा अजून यायचा आहे. मुख्यमंत्री बॉलिवूडच्या लोकांसोबत नाचत होते. बॉलिवूडच्या लोकांना फोन करू करू बोलवलं गणपती दर्शनाला. पण ते नागपूर ला गेले नाहीत तिथे दौरा केला नाही येथे बसले त्यांना वाटलं बाकी उपमुख्यमंत्री दौरा करतील. (Aditya Thackeray)

दसरा मेळाव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की…

त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी यावेळी दसरा मेळावा, सध्या चर्चेत असलेला मराठी गुजराती मुद्दा आणि मराठा आरक्षणावर भाष्य करतांना सांगितले की; शिवाजी पार्क बद्दल बीएमसीला काय निर्णय घ्यायचा ते घेऊ द्या. आम्ही त्यावर बघू. तसेच मराठी-गुजराती मुद्द्यावर आम्ही आमची भूमिका मांडली आहे यामध्ये जनरल डायर कोण होता हे अजून कळलं नाही. तुम्ही विषय कोणताही विचारला तरी मी फक्त या आज मंत्र्यांच्या दौऱ्यावरच बोलणार आहे. (Aditya Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.