वरळी राहू द्या, मी ठाण्यातून लढून दाखवतो; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान

131

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी वरळीमधून माझ्यासमोर विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान दिले, परंतु ते स्वीकारले नाही. पण आता दोघांनी पण राजीनामा देऊन तुम्ही वरळीतून जिंकून दाखवा अन्यथा ते पेलत नसेल तर मी ठाण्यातून लढून दाखवतो, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. शिवसंवाद यात्रेदरम्यान नाशिकरोड येथील आनंद ऋषी शाळेजवळील मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते.

झालेली गद्दारी कोणालाच पटलेली नाही

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, झालेली गद्दारी ही कोणालाच पटलेली नाही, मात्र आम्ही पाठीत वार केला नाही. हे 40 गद्दार सांगू शकतात का? सुरत, गुवाहाटी, गोवामार्गे आलेले सांगू शकतील का? 50 खोके एकदम ओके असे लोक त्यांना बोलतात ही घोषणा सगळीकडे दिली जात आहे. हाऊसमध्ये हे सुद्धा ओके म्हणतात. राज्यकर्त्यांनी स्वत:ला विकून टाकले, का गेले, कोणासाठी गेले, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झाले, तेव्हा तुम्हाला आनंद नाही झाला. आज मी महाराष्ट्र फिरत आहे, जनतेला सांगतो आहे, मी आहे तिथेच आहे, तुमच्यासाठीच आहे. आपल्या सभेत लोक येतात आणि आम्ही शिवसेनेसोबत आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जे काम केले त्यांचे लोक फॅन झाले आहेत. जे आपले मतदार नव्हते ते देखील शिवसेनेसोबत आहेत. हे गल्लीच राजकारण आपल्याला पळवून लावायचे असल्याचे ते म्हणाले.

( हेही वाचा: ‘बाळासाहेब थोरात आमच्याशी बोलतच नाहीत’; थोरातांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.