आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव भेट : भाजपाच्या विरोधात देशपातळीवर आघाडी उभी करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा गट राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात नवीन पायवाट शोधण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचाच एक भाग म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे मुंबईहुन थेट पाटण्यात आले आहेत. या ठिकाणी त्यांनी लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. आम्हाला देशात रोजगार, महागाई, तरुणशक्ती आणि संविधान यासाठी काम करायचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. या भेटीविषयी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, सध्या देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे आणि ते वाचवण्यासाठी आम्ही जेवढे शक्य आहे तेवढे करू.

भेटीचा अर्थ काय?  

आदित्य ठाकरे यांच्या बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भेटीचे अनेक अर्थ निघत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट देशसापातळीवर नवी आघाडी तयार होते का, याची शक्यता पडताळून पाहत असल्याचे समजते. त्याचवेळी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हेही एनडीएच्या विरोधातील बिगर भाजप पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यासाठी अनेक पक्षांशी चर्चा केली आहे.

राहुल गांधींच्या भेटीनंतर थेट पाटण्यात दाखल

आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या भेटीनंतर तेजस्वी यादव यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. ठाकरे कुटुंबातील कोणताही सदस्य लालू यादव यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी बिहारमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे. आदित्य ठाकरेंसोबत शिवसेनेचे उपनेते अनिल देसाई आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही तेजस्वी यादव यांची भेट घेतली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here